logo

आरोग्य विभागाकडून आदिवासी महिलेच्या आरोग्याशी खेळ..........

प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला परत पाठवले – प्राथमिक आरोग्य केंद्र हतरू
हतरू (ता. चिखलदरा):
आदिवासी भागातील गर्भवती महिलेच्या आरोग्याशी आरोग्य विभागाने गंभीर खेळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूती वेदना सुरू असताना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, हतरू येथे दाखल झालेल्या एका आदिवासी महिलेला योग्य उपचार न देता परत पाठवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली असता तेथे आवश्यक वैद्यकीय सुविधा, डॉक्टरांची उपस्थिती अथवा तत्काळ संदर्भ सेवा (रेफरल) न देता “इतरत्र जा” असे सांगून महिलेला परत पाठवण्यात आले. त्यामुळे माता व गर्भातील बाळाच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता. आरोग्य सेवांमध्ये आदिवासी महिलांबाबत होत असलेला हा निष्काळजीपणा अत्यंत निंदनीय असून, शासनाच्या माता-बाल आरोग्य योजनांचा उद्देशच या प्रकारामुळे धुळीस मिळत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित डॉक्टर, कर्मचारी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी संघटनांकडून होत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा, कर्मचारी उपस्थिती व सुविधा यांची सखोल तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. जर वेळेत उपचार मिळाले नाहीत तर याची संपूर्ण जबाबदारी आरोग्य विभागाची राहील, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.

7
475 views