logo

वाळूनंतर मुरुम माफियांना ब्रेक दहा महिन्यांत ६.६८ कोटींचा दंड.....

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात वाळूपाठोपाठ 'मुरुम माफियांना सर्वाधिक दंड आकारण्यात आला जाहे त्यामुळे वाळूनंतर 'मुरुम माफियांचीही संख्या वाढत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एप्रिल २०२७ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत सर्वाधिक कारवाया जळगाव तालुक्यात झाल्या असताना पारोळ्यातील 'वाळू'माफियांचे 'आलबेल असल्याचे दंडात्मक कारवायातून दिसून आले आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी १ एप्रिल २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीदरम्यान केलेल्या कारवायांचा आढावा घेतला. त्यानुसार या दहा महिन्यांच्या कालावधीत ४९४ वाळू माफियांवर जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे

महसूल प्रशासनाची वसुली 'दम'दार

दरम्यान, गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी गेल्या १० महिन्यात ५२४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ६ कोटी ६८ लाख ८१ हजार ७८२ रुपयांचा दंड ठोठावला असताना त्यापोटी ४ कोटी ४३ लाख २३ हजार ५१८ रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे महसुल प्रशासनाने 'दम'दार वसुली केली असताना मार्च २०२६ पूर्वी मालमत्तांची विक्री करुन दंडात्मक कारवाईची रक्कम भरुन घेतली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

जळगाव (१०२), जामनेर (११), भुसावळ (१), बोदवड (०१), मुक्ताईनगर (१८), यावल (२५), रावेर (०९), अमळनेर (५१), चोपडा (१८), एरंडोल (३५), धरणगाव (२३), पारोळा (५), पाचोरा (५४), भडगाव (६५), चाळीसगाव (६७) या तालुक्यातील माफियांचा समावेश आहे.

जंक्शन'वर सर्वाधिक 'मुरूम'चोर

एकीकडे जळगाव तालुक्यात वाळूमाफियांची चलती आहे तर भुसावळ तालुक्यात 'मुरुम'चोरट्यांची. गेल्या १० महिन्यात २९ मुरुम माफियांच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात जामनेर, बोदवड, चोपडा, एरंडोल, धरणगाव, पारोळा, पाचोरा तालुक्यात एकाही मुरुम माफियावर कारवाई झालेली नाही. भुसावळमध्ये १२ तर मुक्ताईनगर तालुक्यात ५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रावेर व अमळनेरमध्ये प्रत्येकी ३ मुरुम चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

18
436 views