logo

गर्लफ्रेंडच्या संगनमताने जबरी चोरी करणारे आरोपी 2,88,100 ₹ च्या मुद्देमालासह जेरबंद...


गर्लफ्रेंडच्या संगनमताने जबरी चोरी करणारे आरोपी 2,88,100 ₹ च्या मुद्देमालासह जेरबंद...


नगर(शिवप्रहार न्यूज) या बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री सुलभ अंबादास नरसाळे वय-29 वर्षे रा. कल्याण रोड, नालेगाव, ता.जि. अहिल्यानगर हे दिनांक 24/01/2026 रोजी रात्री 12/30 वा.चे सुमारास बारदरी ता.ज. अहिल्यानगर रोडवरील गर्भगिरी फाटा येथे लघवी करण्यासाठी रस्त्याचे कडेला गाडी थांबविली असता मोटर सायकलवरून आलेले ०३ अनोळखी इसमांनी गळ्याला कोयता लावुन बळजबरीने सोने-चांदीचे दागिने रोख रक्कम काढुन घेवुन गेले. सदर घटनेबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 53/2025 बीएनएस कलम 309 (4), 3(5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता.
दरम्यान श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/ हरिष भोये, पोलीस अंमलदार दिपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, प्रशांत राठोड, अमृत आढाव, योगेश कर्डीले, सोनल भागवत, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनाठिकाणी भेट देवुन फिर्यादीकडुन आरोपींचे वर्णन प्राप्त करुन गुन्ह्यातील आरोपींचा व्यवसायिक कौशल्याचे आधारे शोध घेत असतांना, पथकाला दिनांक 30/01/2026 रोजी माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा शुभम शहादेव बडे याने साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह तपोवन रोड येथे एका गाडीवर बसलेला असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर माहिती आधारे तपोवन रोड येथे सापळा रचुन शिताफिने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) शुभम शहादेव बडे, वय- 26 वर्षे, रा.वाणीनगर, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर, 2) सोहेल पापाभाई सय्यद, वय- 29 वर्षे रा. देवटाकळी, ता. शेवगाव जि. अहिल्यानगर, 3) अशपाक नासिर पठाण वय- 28 वर्षे रा. यशवंतनगर, भिंगार ता.जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. पथकाने आरोपी नामे शुभम शहादेव बडे याचेकडे सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा आम्ही तिघांनी त्यांच्या मैत्रिणी/गर्लफ्रेंड वैष्णवी उनवने व रुपाली बनकर यांचेशी संगमनत करुन केल्याचे सांगुन चोरी केलेले सोन्याचे दागिणे मित्रांनी वैष्णवी उनवने व रुपाली बनकर यांचेमार्फतीने विक्री केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर सदर दोन्ही महिला यांचा शोध घेत असतांना त्या दोन्ही महिला भगवानबाबा चौक, अहिल्यानगर येथे मिळुन आल्याने त्यांना त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव 4) वैष्णवी राजेंद्र उनवने वय- 24 वर्षे रा. सारंग अपार्टर्मेट, भगवान बाब चौक, मुळे इस्टेट, अहिल्यानगर, 5) रुपाली गजानन बनकर वय- 24 वर्षे रा. डेअरी चौक, एन.आय.डी.सी., अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने वैष्णवी उनवने व रुपाली बनकर यांना गुन्ह्याबाबत व चोरी केलेल्या मुद्देमालाबाबच विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी वरील तिन्ही इसमासोबत मिळुन गुन्हा केल्याचे सांगितले आहे. पुढे वैष्णवी उनवे हिने तिच्याकडे असलेले गुन्ह्यातील चोरीच्या सोन्याचे दागिणे सोनार सुरज शहाणे यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर सोनार 6) सुरज प्रदीप शहाणे वय- 34 वर्षे रा. दत्तमंदीर मागे शास्त्रीनगर, केडगांव, अहिल्यानगर याचेकडे वैष्णवी उनवने हिने विक्री केलेल्या सोन्याचे दागिणे बाबत विचारपुस करता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले आहे.
वरील आरोपीकडुन व आरोपीतांचे सांगणेवरुन 1,48,000/-रु कि.चे 11 ग्रॅम वजानाची सोन्याची गोळी, 60,000/-रु कि.चे 4 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, 80,000/-रु कि.ची एक मोटार सायकल, 100/-रु.कि.चा लोखंडी कोयता असा एकुण 2,88,100/- रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी नामे शुभम शहादेव बडे यांचेविरुध्द अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 तोफखाना, जि. अहिल्यानगर 161/2023 भादवि कलम 376,376(2) पोस्के 4,6,8
2 तोफखाना, जि. अहिल्यानगर 106/2022 म.जु.का.क 12(अ)
3 तोफखाना, जि. अहिल्यानगर 7702/2020 भादवि कलम 307,354,452,324 वगैरे
आरोपी नामे अशपाक नासिर पठाण यांचेविरुध्द अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 भिंगार कॅम्प, जि. अहिल्यानगर 641/2023 भादवि कलम 307,364,120(ब),143,147,201
2 भिंगार कॅम्प, जि. अहिल्यानगर 709/2024 बी.एन.एस. कलम 118(1),115(2),351(2),352,
ताब्यातील आरोपींना अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन गु. र. नं. 53/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4),3(5) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views