logo

मुंबई पोलिस यांची उत्तम कामगिरी ..पण परप्रांतीय लोक कसे मुंबई चे भारत चे नाव बदनाम करत आहेत टुरिस्ट ना लुटून..अतिथी देवो भव:!

मुंबईत एका अमेरिकन महिलेला अवघ्या ४०० मीटरच्या प्रवासासाठी १८,००० रुपये आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी संबंधित टॅक्सी चालकाला अटक केली आहे. ही घटना मुंबई विमानतळ परिसरातील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जानेवारी रोजी घडली. अमेरिकेतून मुंबईत आलेली ही महिला विमानतळावरून जवळच असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी टॅक्सीत बसली होती. संबंधित हॉटेल विमानतळापासून काहीशे मीटर अंतरावर असतानाही, टॅक्सी चालकाने तिला थेट हॉटेलवर नेण्याऐवजी सुमारे २० मिनिटे अंधेरी (पूर्व) परिसरात फिरवले. त्यानंतर हॉटेलवर सोडत तिच्याकडून १८,००० रुपये, म्हणजेच सुमारे २०० अमेरिकन डॉलर्स आकारले.

या घटनेची वाचा २६ जानेवारी रोजी फुटली, जेव्हा संबंधित महिलेने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला अनुभव शेअर केला. तिने टॅक्सीचा नंबरही पोस्ट केला होता. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी स्वतःहून कारवाई सुरू केली. २७ जानेवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. महिलेने शेअर केलेल्या टॅक्सी नंबरच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची टॅक्सीही जप्त केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव देशराज यादव असून त्याचे वय ५० वर्षे आहे. घटनेच्या वेळी टॅक्सीत चालकासोबत आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. त्या व्यक्तीची भूमिका काय होती, याचा तपास पोलीस सध्या करत आहेत. तसेच, आरोपी चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तात्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून पोलीस तत्काळ कारवाई करू शकतील.

1
0 views