logo

वाळू माफियांचे लमांजन, विटनेरमध्ये डंपरसह मशीन जप्त



महसूल पथकासह ग्रामस्थही उतरले नदीपात्रात

जळगाव : महसूल विभागाने स्थानिक

ग्रामस्थांच्या सहकार्याने शुक्रवारी गिरणा नदी पात्रात वाळूमाफियांविरोधात मोठी कारवाई केली आहे. जळगाव तालुक्यातील लमांजन आणि विटनेर परिसरात अनधिकृत वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या दोन डंपरसह वाळू उपसा करणारी दोन मशीन महसूलच्या पथकाने ताब्यात घेतली आहेत.

३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाला स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिली. त्यानुसार लमांजन आणि विटनेर शिवारात धडक कारवाई केली. यावेळी लमांजन येथील गिरणा नदी पात्रातून चक्क मशीनद्वारे वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

पथक पाहताच पळापळ

पथकाला पाहताच वाळू माफियांची पळापळ झाली, यावेळी लमांजन येथील ग्रामस्थ व महसूल विभागाने तत्परता दाखवत दोन मशिन आणि वाळू वाहतूक करणारे दोन डंपर जप्त केले. यासह विटनेर शिवारातदेखील रात्री महसूलच्या पथकाने एक डंपर ताब्यात घेतल्याची माहिती तहसीलदार शीतल राजपूत यांनी दिली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोरा येथील वाळू चोरी रोखण्याची मागणी होत आहे.

19
429 views