logo

लेख :- मा. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳💐😢 सोमनाथ तडवळकर. मराठी चित्रपट अभिनेता.



लेख :- मा. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳💐😢
सोमनाथ तडवळकर. मराठी चित्रपट अभिनेता.

मला कळू आलं तेव्हा राजकारणाची मला जिज्ञासा म्हणून आवड निर्माण व्हायला लागली होती. बदल घडवण्याची, दुःख कमी करण्याची, विकास करून आयुष्य सुंदर करण्याची कला असलेलं माध्यम म्हणून मी राजकारणाकडं बघत वाचत ऐकत लहानाचा मोठं होताना, करियर म्हणून राजकारणात जावं अशा विचारापरेंत मी पोहचलो होतो. वय कमीच होत पण करियरचा निर्णय घेण्याच वय 18 झाल होत. 1995 ला करियरचा विचार करत मी कित्तेक महिने तासन तास जरीमरीच्या (कुर्ला ) डोंगरावर बसून विमानतळाकडं विमान बघत एकटाच विचार करत बसत होतो. त्या काळात मी एवढी विमान उडताना, उतरताना पाहिली होती की, विमानांच्या आवाजावरून मी विमान कोणत्या देशाच व कोणत्या एअर लाईन्सच आहे. व त्यांची उड्डाणं वेळ पाठ झाली होती. कित्तेक वेळा मी उगाचच पायलट को पायलट यांना हात दाखवून आपण ओळखीचे आहोत असं वाटायच, तो माझा विरंगुळा झाला होता. घर तिथंच होत म्हणून तेव्हा असं वाटायच. पदवीधर होऊन IAS व्हाय किंवा IPS व्हाय वाटायच पण ह्याला परिस्थी अनुरूप वाटली नाही म्हणून मीच फुली मारली. नंतर वाटल व्यवसाय करावा हॉटेल, फेक्ट्री असं काही शाळकरी वयात अनेक पडेल ती काम करत शिक्षण झालं होत म्हणून. पण त्यात जम बसायला पैसा लागतो आणी तो कमवायला आयुष्य जाईल म्हणून पुन्हा त्यावर फुली मारली. मंग वाटलं राजकारणात जावं आपल्याला त्यात गती आहे. मंग त्या विषयांचं सगळं वाचून काढलं चे गव्हेरा, मार्क्स, माओ, लेनिन, लिंकन, फुले शाहू, आंबेडकर, गांधी , नेहरू, भागतसिंग, आण्णाभाऊ, अस सगळं हदाश्या सारख वाचन केलं. दिवसभर उपाशीपोटी अख्खी मुंबई पालथी घालत फिरायचो. कसलाही कार्यक्रम कुठं आहे हे वर्तमान पत्रात आजचे कार्यक्रम सदर वाचून गर्दीत सहभागी होऊन ऐकत बघत बसायचो. धार्मचे , जातीचे कडवट विचारांचे दलित शिक्षित, अशा सगळया पक्षांचे, हौशी, गौशी नाटक, सिनेमा महोत्सव, प्रदर्शन काही सुटलं नाही माझ्या तडाख्यातून. सगळी मुंबईची कॉलेज, सभागृह. गाता येत नाही पण कोरस मध्ये हेल काढत भाग घ्यायचो. अभिनय येत नाही पण पथ नाट्यात सहभगी व्हायचो. कुठं संधी भेटली की सभा रेटून बघायचो. ओळख ना पाळख ना गुरु, ना शिष्य ! सगळं हरफन मौला चालू होत. असं करत राजकीय गोटात पोहचलो. आणि राजकीय विद्रुप चेहरे कळायला लागले. कळलं लईच डेंजर आहे हे सगळं, गुंड पुंड चोर चिटर यांच्या सोबत पण कुठून. कुठून काय येत कस होत ते बघून मला ते खूप डेंजर वाटायच. पण मला आतलं राजकारण कळायला लागलं तेव्हा कळलं डॉन,भाई , शुटर, गुंड हे रामा गडी दल्ले फ आहेत. खरे डेंजर लोक तर पांढऱ्या कपड्यात सत्ताधारी राजकीय पदावर असतात. किरकोळ लोक विरोधात संघर्ष करतात. उपोषण, आंदोलन क्रांतीची भाषा करत उपाशी पोटी सभा रेटत फिरतात. पोलिसांचा मार खातात. वकिलांकडून लुटले जातात. असो ! हे लईच बेक्कार धंदा आहे म्हणून मी त्यावर फुली मारली आणि कशाच काही माहित नसताना चित्रपटात अभिनेता आणि निर्माता व्हयाच असं स्वतःलाच निक्षुन सांगितलं आणि विमान बघत बसायच बंद झालं आणि चित्रपट सिने जगतात पाय रोवायच म्हणून हुजरेगिरी करत फिरायला लागलो. लागतील 25 वर्ष पण समाधान मिळेल जागल्याच . तशीही 25 वर्ष लागलीच बास्तान बसायला. आता सुद्धा वाटत बरे झाले आपण राजकारणात गेलो नाही . सत्तेच्या पटावर खूप डाव खेळले जातात त्यात नको असलेल्या जीवांची किंमत कुत्र्या, मांजरा सारखी असते. सगळं काही स्क्रिप्टेड असत. बर वाईट सुद्धा नियोजन बद्ध केल जात. लोक त्याला विजय, अपघात, अपघात, घात असं काहीही म्हणतात. पण सिनेमाचे लेखक चिल्लर आहेत . राजकारण्यापुढं स्क्रिट बजेट दिग्दर्शक नट नट्या खरे नाट्य चित्रपट राजकारणी बनवतात. हिरो विलन सगळं काही. आणि ते खर खर असत. सिनेमे आधारीत काल्पनिक असतात. विद्रुप चेहरे रंगवले जातात . खरे चेहरे दिसत नसतात.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views