राजमाता जिजाऊ, फातिमा शेखसह सावित्रीबाई फुले यांचे आदर्श जोपासावे- सरपंचा सौ. स्वातीताई हुमने
राजेदहेगाव येथे अनेकांचा सत्कार
राजमाता जिजाऊ, फातिमा शेखसह सावित्रीबाई फुले यांचे आदर्श जोपासावे- सरपंचा सौ. स्वातीताई हुमने
राजेदहेगाव येथे अनेकांचा सत्कार
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- राजमाता जिजाऊ आणि फातिमा शेख यांचा इतिहास अभ्यासतांना आपल्याला क्रांतीज्योती सावित्रीमाईंचे कार्य अभ्यासावे लागते. फुले दाम्पत्यांना जेव्हा त्यांचे वडील गोविंदराव घराबाहेर काढतात व जागेच्या शोधात भटकट असतांना त्यांना उस्मानभाई शेख यांनी आपल्या ओसरीत आसरा दिला. इथेच त्यांची बहीण फातिमा शेख यांची ओळख होते. नंतर हीच फातिमा सावित्रीबाईंच्या सोबतीने शिक्षण ग्रहण करते. नॉर्मल स्कूल मधून ट्रेनिंग घेतलेली पहिली शिक्षिका म्हणून अध्यापनाचे कार्य करते. सावित्रीबाईंची सखी- मैत्रीण म्हणून तिच्या सर्व सामाजिक आणि कौटुंबिक मदतीला धावून येणारी फातिमा ही खरोखरच समाजाच्या रोशाला भीक न घालता सावित्री जोतिबा यांच्या कार्याला संपूर्णपणे आपले जीवन समर्पित करते. आज फातिमा शेख यांची ओळख आपल्याला होत असली तरी त्या काळात मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही समाजाचा रोष त्यांना पत्करावा लागला होता. तरीही न डगमगता फातीमाने सावित्रीची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. स्वराज्य संकल्पित राजमाता माँ जिजाऊ यांना रयतेचे राज्य निर्माण करावयाचे होते. त्यासाठी त्यांनी जीवाची पर्वा न करणारा शिवाजी घडविला. आणि बाळ शिवाजीचा छत्रपती राजे शिवाजी पर्यंतचा प्रवास स्वतःच्या मार्गदर्शनात घडवून आणला. म्हणून राजमाता जिजाऊ, फातिमा शेखसह सावित्रीबाई फुले यांचे आदर्श जोपासावे असे प्रतिपादन राजेदहेगाव येथील सरपंचा सौ. स्वातीताई रत्नदीप हुमने यांनी केले.
त्या संयुक्त जयंती सोहळा समिती, महिला मंडळ व ग्राम पंचायत, समस्त ग्रामवासी राजेदहेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती महोत्सव ग्राम पंचायत कार्यालय राजेदहेगाव येथील भव्य पटांगणावर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत राजेदहेगाव येथील सरपंचा सौ. स्वातीताई रत्नदिप हुमने होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बाल सहाय्यक कक्षाच्या समुपदेशक सुषमा बन्सोड, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रामप्रसाद मस्के, भारतीय आट्यापाटया संघ दिल्लीच्या कर्णधार तथा सुवर्णपदक विजेती कु. प्राची दुर्गा केशव चटप, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजेदहेगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. आमना खान, उपसरपंच अश्विन थोटे, दुर्गा चटप, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेश ढोबळे, महिला बचत गट प्रमुख लताताई ढोबळे, प्रतिभाआई मुनिंद्र हुमने, ग्राम पंचायत सदस्य प्रगती वैद्य, सविता चन्ने, अश्विन हुमने, निशाताई उके, प्रज्ञाताई ढोबळे, मंदाताई बावने, मंगेश मडावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य संकल्पित राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, अल्पसंख्याक समाजातील पहिली मुस्लिम स्त्रीशिक्षिका फातिमा शेख, डॉ. बाबासाहेबांचे आधारवड रमाबाई आंबेडकर या महानायकांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, माजिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन, मार्ल्यापण व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
त्याप्रसंगी गौरव जिजाऊ व सावित्रीच्या लेक भारतीय आट्यापाटया संघ दिल्लीच्या कर्णधार तथा सुवर्ण पदक विजेती कु. प्राची चटप हिच्या सह विविध क्षेत्रात उंच भरारी घेऊन नोकरीवर लागलेल्या युवक - युवतींचा आई - वडीलांसह शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आले. त्यावेळी महिलांनी आकर्षक लेझीम सादर केले. गावातील महिला, विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व युवक बिरादरी शाखा भंडारा च्या चमुनी जनजागृतीवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच उत्कर्ष लेंडे, अनुश्री वासनिक, अनिषा ढोबळे, इतिका साखरवाडे यांनी स्त्रीशक्ती विषयी पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली. आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकतांना त्यांच्या आयुष्यातील अनेक घटकांचा प्रेरणादायी प्रवास मांडला. स्त्रीशक्ती विषयी पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली.
उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माॅ जिजाऊ यांच्या कार्याविषयी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
परिसरातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी शिक्षक-शिक्षिका, युवक-युवती व गावकरी महिला -पुरूष मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा हुमणे व प्रास्ताविक रंजना लेंडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार नूतन ईटनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयुक्त जयंती सोहळा समिती, महिला मंडळ राजेदहेगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015