दशसुञी कार्यक्रमांतर्गत आरोग्य समुपदेशन कार्यशाळा संपन्न
पैठण,प्रतिनिधी: सब्दर शेख
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून.मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण,व गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे आरोग्य समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक यांचे प्रशालेच्या वतीने शॉल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक व जनसेवा रुग्णालय पैठण यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी डॉ. सबाहत खान,यांनी विद्यार्थ्यांना जंक फूड व बंद पॅकेट मधील पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम तसेच योग्य आहार व विहार यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर डॉ.सृष्टी पिंपळे यांनी हात कधी धुवावे व कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले, डॉ.बाबुराव कानडे,यांनी सकस आहार कोणता असतो,कोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजे आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ.विकास यांनी किशोर वयीन विद्यार्थ्यांनी मावा,गुटखा, सुपारी,व तंबाखूजन्य पदार्थ या पासून दूर राहिले पाहिजे या पासून आपल्या शरीरावर होणारे परिणाम बाबत माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापक अंकुश गाढे,केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर वाडेकर, क्रीडा विभाग प्रमुख समशेर पठाण उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेषराव गरजे,जयाजी गटकळ, विजय खाटिक,वैशाली कुटे, सय्यद शबाना,शेख नेहा,ज्योती बलखंडे,शेख चांद यांनी परिश्रम घेतले.