logo

गिरणेला ओरबाडण्यासाठी माफियांचे नवे जाळे

जळगाव : गिरणा नदीच्या पात्रातून वर्षानुवर्षे बेसुमार वाळू उपसा केल्यानंतर आता वाळूमाफियांनी आपली नजर जळगाव तालुक्यातील कानळदा, नंदगाव आणि धरणगाव तालुक्यातील रेल परिसरातील ताज्या साठ्याकडे वळवली आहे. आव्हाणे, खेडी आणि सावखेडा भागात वाळूचा साठा संपून खडक उघडे पडल्याने आता माफिया वाळूसाठी व गिरणा नदीचे खरे 'नंदनवन' असणाऱ्या कानळदा परिसरातील स्थलांतरित झाले आहे. पात्रात

कानळदा आणि नंदगाव परिसरातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात उपसा झाला नव्हता. मात्र, आता हा भाग माफियांच्या नजरेत भरला आहे.

कानळद्यात ग्रामस्थांचा वाळू उपशाला मोठा विरोध असतानाही, माफिया या विरोधाला न जुमानता रात्रीच्या वेळी नदीपात्र ओरबाडत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी रेल येथील शेतकरी वाळू उपसा करण्यास विरोध करायला गेले असता, वाळूमाफियांनी शेतकऱ्याऱ्यांना जबर मारहाण केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही रेल ग्रामस्थांनी नदीत उतरून वाळू उपसा करण्यास विरोध केला होता.

2
709 views