logo

युवकांच्या यशाचे सन्मान, स्वराज्य पक्षाकडून अभिनंदन. विविध केंद्रीय सुरक्षा दल आणि सरकारी सेवेत निवड झालेल्या

*युवकांच्या यशाचे सन्मान, स्वराज्य पक्षाकडून अभिनंदन.*
विविध केंद्रीय सुरक्षा दल आणि सरकारी सेवेत निवड झालेल्या तेल्हारा परिसरातील युवकांच्या यशाचे उत्साहपूर्ण सन्मान स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आले. गौतम तायडे भोकर, CISF) संकेत घाटोळ ईसापुर, CISF) नागेश जुमळे दहिगाव, CISF) अक्षय सुभाष ढोले घोडेगाव, CRPF) शुभम भिसे पाथर्डी, लिपिक उच्च न्यायालय मुंबई) आणि सुरेंद्र वानखडे वारखेड, BSF) अजय मानकर पाथर्डी, CISF) दत्ता उत्तमराव ढोले घोडेगाव, NPCIL) यांनी कठोर परिश्रमाने निवड मिळवली आहे. विशेषता दत्ता उत्तमराव ढोले यांनी रात्रंदिवस अभ्यास करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत NPCIL मध्ये स्थान मिळवले. त्यांच्या यशाने परिसरातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.या सर्व युवकांच्या घरी जाऊन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचेसह सहकाऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. यावेळी आशिष शेळके, शिवम ईसापुरे, मयुर शेगोकार, शुभम चिंचोलकार यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते. हे यश केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद आहे. अशा मेहनती युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वराज्य पक्ष कटिबद्ध असल्याचे डिक्कर यांनी सांगितले.

0
0 views