आदरणीय अजितपवार यांचे सुरक्षा अधिकारी विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार
अजित पवारांचे सुरक्षा अधिकारी विदिप जाधव यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) विदिप जाधव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विमान अपघातात झालेल्या त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या लहान मुलाने पार्थिवाला मुखाग्नी दिला तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले होते. या अंत्यविधीसाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्तव्य बजावत असताना झालेल्या या अपघातामुळे एका निष्ठावान अधिकाऱ्याला मुकावे लागल्याची भावना व्यक्त होत असून, जाधव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.