logo

भाटपुरी येथील बनावट १६०० जन्म नोंदी रद्द


उर्वरित ३३०७ जन्म नोंदीची तपासून होणार कारवाई

जळगाव : पारोळा तालुक्यातील रताळे
ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत भाटपुरी या हल्ली अस्तित्वात नसलेल्या उजाड गावातील ४ हजार ९०७ जन्माच्या नोंदी बनावट आढळून आल्या होत्या. त्यातील तब्बल १६०० जन्म नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच आगामी काळात इतर नोंदीची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील बनावट जन्म नोंदीनंतर सर्व जिल्ह्यात जन्माच्या नोंदणीची तपासणी करण्यात आल्याने पारोळा तालुक्यातील भाटपुरी या गावात जन्म नोंदीमध्ये परप्रांतीय नावे आढळून आल्याने जन्म नोंदी तपासली आढळून आंल्या. त्यातील संशयितास यवतमाळ येथून अटक करण्यात आली असता ४ हजार ९०७ नोंदी बोगस आहे.

तपास पारोळा पोलिसाकडे

पारोळा तालुक्यातील भाटपुरी या गावातील ग्रामपंचायतीत सन २०१० ते २०२५ या १५ वर्षांच्या कालावधीत ४२०७ बनावट जन्म नोंदी आढळून आल्याने जि.प. प्रशासनाकडून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणातील संशयिताला यवतमाळ येथे अटक आली आहे. त्याकडून कोण कोणत्या गावात बनावट नोंदी केल्या आहेत. याबाबत माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले

0
210 views