logo

भाजपाच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली

समीर नवाज भंडारा.
भंडारा:- सामान्य जनतेशी नाळ जोडलेले, राज्याच्या विकासासाठी अखंडपणे झटणारे नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांचे विमानाला बारामती येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
अजितदादांची प्रशासनावरची मजबूत पकड, कामाचा अफाट वेग आणि लोककल्याणाचा अखंड ध्यास या साऱ्यांमुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
आज भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्हा तर्फे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते .
शोक सभेला भाजपा जिल्हा अध्यक्ष आशु गोंडाने, जिल्हा महामंत्री मयुर बिसेन, भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, भंडारा नगर परिषद अध्यक्ष मधुरा मदनकर, चंद्रकला भोपे, रुबी चड्ढा, संदीप मेश्राम, हरिचंद मडावी, प्रीती ब्राह्मणकर, श्रध्दा डोंगरे, रोशनी पडोळे, भाग्यश्री कळंबे, निलेश गाढवे, प्रदीप साठवणे, रवींद्र नेवारे, शेलेश मेश्राम, पप्पू भोपे, अक्षय भिवगडे, निमिष डोकरीमारे आदीनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

2
99 views