logo

adnavis : देवा... कोकणच्या विकासाकडे लक्ष ठेवा! जि. प., पं. स. निवडणुकीच्या निमित्ताने चिपळूणमध्ये महायुतीची सभातेथून डोंगर उतारावरून येणारे पाणी वाहत

Devendra Fadnavis : देवा... कोकणच्या विकासाकडे लक्ष ठेवा!
जि. प., पं. स. निवडणुकीच्या निमित्ताने चिपळूणमध्ये महायुतीची सभातेथून डोंगर उतारावरून येणारे पाणी वाहत जाऊन पश्चिमवाहिनी नद्यांना मिळते. त्यातून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो. यामुळे कोकणातील पश्चिमवाहिनी नद्या गाळाने होरल्या आहेत. परिणामी, कोकणातील संगमेश्वर, चिपळूण, राजापूर, खेड, महाड अशा शहरांमध्ये पूर येतो. त्यामुळे कोकणातील नद्या गाळमुक्त करण्यासाठी शासनाने प्राधान्याने धोरण अवलंबिणे गरजेचे आहे. त्यासाठी भरीव निधीची तरतूद होणे अपेक्षित आहे. चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी देखील शासनाने कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर आराखडा तयार करून तो अंमलात आणणे काळाची गरज बनली आहे. तसेच गेली 50 वर्षांहून अधिक काळ कोयना धरणाच्या पाण्यावरती वीजनिर्मिती करून सोडण्यात येणारे अवजल वाशिष्ठी नदीतून वाहून अरबी समुद्राला मिळते. हे पाणी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेळविल्यास कोकण सुजलाम्‌‍ सुफलाम होईल. अनेक वर्षांची ही मागणी अपूर्णच राहिलेली आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, कोकणचा निसर्ग टिकला तरच राज्यात पाऊसपाणी चांगले होईल. यावर विश्वास ठेवून कोकणामध्ये प्रदूषणकारी प्रकल्प कसे येणार नाहीत याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नैऋत्यकडून येणारे मोसमी वारे केोकणची अभेद्य भिंत असणाऱ्या पश्चिम घाटाला ओलांडून महाराष्ट्रासह देशभर पसरतात. यामुळे मोसमी पाऊस अरबी समुद्राकडून देशभरात जात असतो. त्यामुळे कोकणचा निसर्ग जपणे ही काळाची गरज बनली आहे. याचा विचार करून कोकणामध्ये प्रदूषणकारी प्रकल्प येणार नाहीत आणि येथील निसर्गाचे संरक्षण होईल. यासाठी शासकीय धोरण आखणे जरूरीचे आहे. तसेच कोकणच्या पर्यटनासाठी विशेष प्राधान्य देणे जरूरीचे आहे. आगामी काळात महाराष्ट्र शासनाने कोकणच्या विकासासाठी स्वतंत्र विचार करणे आवश्यक आहे. आजवर अनेक राजकीय पक्ष, नेते आले आणि गेले. मात्र, कोकण विकासापासून दुर्लक्षितच राहिला. कोकणच्या विकासाचा अनुशेष कायमच शिल्लक राहिलेला आहे. त्याकडे देवाभाऊंनी लक्ष ठेवावे इतकेच...!

4
176 views