logo

आज सनातन जागरण राष्ट्रकल्याण वेद यज्ञ महारथयात्रा नांदेडात


नांदेड, दि. २७ - महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विजन्मशताब्दी व स्वामी श्रद्धानंद बलिदान शताब्दी आणि आर्य समाज स्थापना १५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्त रामेश्वरम तामिळनाडू ते श्रीनगर जम्मू काश्मीर पर्यंत सनातन जागरण राष्ट्रकल्याण वेद यज्ञ महारथयात्रा दि. २८ जानेवारी २६ रोजी नांदेडच्या पावन नगरीमध्ये येत आहे या रथयात्रेमध्ये दररोज सकाळ ते सायंकाळपर्यंत अखंड यज्ञ चालू आहे. सर्व धर्मप्रेमी महानुभव तसेच सनातन जागरण चे सर्व पदाधिकारी व शहरातील सर्व हिंदू धर्मप्रेमी लोकांनी या महायज्ञामध्ये तन मन धनाने आहुती मध्ये सहभागी व्हावे.
या सनातन जागरण रथयात्रेमध्ये आपण सर्व सादर आमंत्रित आहात. या रथयात्रेचे आगमन नांदेड शहरात चंदा सिंग कॉर्नर या ठिकाणी सायंकाळी ४ वाजता होत आहे.
या रथयात्रेचा मिरवणुकीचा मार्ग खालील प्रमाणे आहे. चंदासिंग कॉर्नर ते ढवळे कॉर्नर, दूध डेरी, वसरणी, मोंढा नाका, जुना मोंढा, आर्य समाज मंदिरासमोरून, टॉवर चौ रस्ता वरून गुरुद्वारा चौरस्ता, महावीर चौक, वजीराबाद चौक, कला मंदिर मार्गे, शिवाजीनगर, फुले मार्केट, आयटीआय चौक, साठे चौक, महाराणा प्रताप चौक, हनुमान गड कमान या ठिकाणी वाईट हाऊस येथे श्री कंठेवाडजी यांच्या घरी पोहोचणार आहे. व या ठिकाणी सायंकाळी सात वाजता सत्संग होणार आहे. आपण सर्व भाविक व राष्ट्रप्रेमी व सनातन प्रेमी, धर्मप्रेमी सज्जनाने या रथयात्रेच्या मार्गक्रमणामध्ये ठीक ठिकाणी उपस्थित राहून प्रचंड उत्साहात स्वागत करावे व या रथयात्रेत सहभागी व्हावे.

0
0 views