
अविनाश शिळीमकर गावडे,कोरे,सावंत यांना राष्ट्रपती पदक जाहीर पूर्वसंध्येला घोषणा
अविनाश शिळीमकर गावडे,कोरे,सावंत यांना राष्ट्रपती पदक जाहीर पूर्वसंध्येला घोषणा ! अनिलराव पाटील (वाशिम जिल्हा ) प्रतिनिधी. प्रजासत्ताक दिनाच्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शंकरराव शिळीमकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. 77 व्या प्रजासत्ता दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलाची मान उंचावली आहे. सोबतच पोलीस उपाधीक्षक दयानंद गावडे निरीक्षक महेंद्र कोरे व एएसआय प्रदीप सावंत यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. शिळीमकर हे पुणे जिल्ह्यातील तांबाड गुंजन मावळ (ता.भोर ) येथील शेतकरी कुटुंबातून पोलीस सेवेत दाखल झालेले शिळीमकर यांचे एमबीए (पीपीएम) पर्यंतचे उच्च शिक्षण झाले आहे. पोलीस सेवेत त्यांनी 32 वर्षाहून अधिक कालावधी पूर्ण केला आहे. त्यांनी मुंबई,सातारा,नागपूर अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीण या ठिकाणी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले आहे. उत्कृंष्ट आणि उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल अधिकारी,कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशातील पोलीस अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारातमक सेवेतील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवापदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रांतील एकूण 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.