logo

रिसोड येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रिसोड येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महेंद्र कुमार महाजन

रिसोड (प्रतिनिधी) -
येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे अध्यक्ष ॲड.किरणराव सरनाईक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले, त्यानंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले, त्यानंतर प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मंचावरील उपस्थित ॲड.किरणराव सरनाईक, सुधाकरराव देशमुख, माजी प्राचार्य डॉक्टर के बी देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोडला नव्याने परवानगी मिळालेल्या एनसीसी बटालियनच्या वतीने पथसंचलन सादर करण्यात आले, आमदार सरनाईक यांच्या प्रवेशावेळी एनसीसी बटालियनचे प्रमुख प्रा.अभिजीत देशमुख यांनी त्यांना सलामी दिली, तर एनसीसी बटालियन ने सादर केलेल्या उत्कृष्ट पथसंचालनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले, त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार देशभक्तीपर गीतावर आधारित सामूहिक कवायत सादर करण्यात आली. यावेळी शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कठीण परिस्थितीतही मनुष्य कशाप्रकारे उच्च विद्या प्राप्त करू शकतो यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले, तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करून यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय देशमुख यांनी केले, त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थित मान्यवरांसमोर शाळेच्या प्रगतीचा आलेख वाचून दाखविला, विज्ञान प्रदर्शनी मध्ये राज्यस्तरावर शाळेला घेऊन जाणाऱ्या जय गजाननराव देशमुख या विद्यार्थ्याचे व त्याच्या मार्गदर्शक शिक्षिका अर्चना देशमुख व प्रतिमा आकोशे यांचा आमदार सरनाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मागील वर्षीच्या दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गावातील प्रतिष्ठित नागरिक व श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या गुणवंत पारितोषिक योजनेअंतर्गत प्राप्त पारितोषिकांचे वितरनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांना मोहित करून टाकले, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय देशमुख व डिगांबर पाचरणे यांनी केले.

17
1735 views