logo

वत्साई एज्युकेशन सोसायटीत गणराज्य दिन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी रंगत

वत्साई एज्युकेशन सोसायटीत गणराज्य दिन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी रंगत

अमळनेर प्रतिनिधी
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) व पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे २६ जानेवारी गणराज्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. संस्थेचे संचालक मनस्वी भदाणे व विवेक भदाणे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत भदाणे, सचिव गायत्री भदाणे मॅडम तसेच संचालक धनश्याम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर पर्ल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य व विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमात उत्साहाची लहर पसरली.
यावेळी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस वितरण समारंभही पार पडला. English Marathon शाळास्तरीय स्पर्धेत ९८% गुण मिळवत इयत्ता दुसरीतील गुरु मोरे याने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्याला प्रमाणपत्र व टॉफी देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमुद मगर व साई चौधरी यांनी उत्तमरीत्या पार पाडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंजल पाटील मॅडम, उत्कर्षा लोकंक्षी मॅडम, वर्षा पाटील मॅडम, प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर, विजय चौधरी सर, उमेश पाटील व सखाराम पावरा यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाचा आनंददायी समारोप करण्यात आला.


2
0 views