logo

शिवसेना (UBT) वाशिम जिल्हाप्रमुख सुरेश मापारींचा रिॲलिटी चेक'व्हायरल फोटोमागचे सत्य

#शिवसेना (UBT) #जिल्हाप्रमुख मापारींचा '#रिॲलिटी चेक'
#व्हायरल फोटोमागचे सत्य

#मित्रांनो
सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, वाशिम शिवसेना (UBT) जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून मापारी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, 'ब्रेकिंग न्यूज'ने केलेल्या थेट पडताळणीत या सर्व चर्चा फोल ठरल्या असून, मापारी यांनी स्वतः समोर येत या अफवांचा पडदाफाश केला आहे.

#सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सुरेश मापारी हे राज्याच्या सत्ताधारी गटातील प्रमुख नेत्यांसोबत अर्थात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत दिसत आहेत. हा फोटो समोर आल्याने वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. "मतदार ज्या निष्ठेने मतदान करतो, ती निष्ठा आता सत्तेच्या बाजारात लिलावात निघाली आहे का?" असा प्रश्न विचारला जात होता.

'#रिॲलिटी चेक'
या व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही थेट सुरेश मापारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की,
"सध्या जो फोटो व्हायरल केला जात आहे, तो जुना आहे. जाणीवपूर्वक चुकीची चर्चा घडवून आणण्यासाठी हा प्रकार केला जात आहे," असे मापारी यांनी स्पष्ट केले.

यावेळी मापारी म्हणाले की, "आम्ही 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' यांच्या शिवसेनेतच आहोत आणि तिथेच राहणार. वाशिमच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, तो आम्ही तोडणार नाही." असा त्यांनी. संदेश दिला आहे.

मातोश्रीवर आज भेट
आज २४ जानेवारी रोजी सुरेश मापारी हे मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, पक्षातील #आगामी रणनीतीवर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

1
736 views