26 जानेवारी निमित्त पैठण तालुक्यातील 10,880 विदयार्थ्यांनी एकाच वेळी गायले राष्ट्रगीत.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांच्या कल्पकतेने व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण,शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण,यांच्या मार्गदर्शनाखाली, दशसूत्री कार्यक्रम अंतर्गत "संस्कार दशसूत्रीचे,रंग राष्ट्रभक्तीचे,"संस्कारातून राष्ट्रभक्तीकडे,हा कार्यक्रम घेण्यात आला,या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच वेळी 1 लाख 25 हजार विद्यार्थी सामुहिक राज्यगीत, राष्ट्रगीत व संगीत कवायत मध्ये सहभागी झाले होते.याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे.ज्यामध्ये पैठण तालुक्यात05 ठिकाणी एकाच वेळी-10,880 विद्यार्थ्यांनी संगीत सामुहिक कवायतीचे प्रात्यक्षिक केले.
यावेळी नायब तहसीलदार राहुल बनसोडे,गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड,सहाय्यक गटविकास अधिकारी,राजेश कांबळे,शि.वि.अधिकारी रंगनाथ आढाव,कार्यालयीन अधीक्षक सतीश आखेगावकर,तालुका समन्वयक समशेर पठाण,केंद्र प्रमुख उत्तम खरात,ज्ञानेश्वर वाडेकर,बळीराम भुमरे, बाबासाहेब पवार,आप्पासाहेब पवार,भगत,राम तांगडे,रमेश पवार,मंगला मदने,मुख्याध्यापक अंकुश गाढे,सलीम शेख,दिलीप थोटे,निलेश गायकवाड,सचिन सेवनकर,शिवाजी पठाडे,भास्कर कुलकर्णी,जकी अन्सारी, प्रभाकर खंबाट,आबासाहेब कणसे,धर्मेंद्र येवले,झारगड, जाधव,ठाणगे,रकटे,बाजे,क्रीडा समन्वयक लक्ष्मण सपकाळ, बालाजी नलभे,इत्यादी उपथित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण कावसानकर,नगर परिषद पैठण,मौलाना आझाद नागरी पतसंस्था पैठण,नगरसेवक रफिक कादरी,इम्रान पठाण, गौरव आठवले,रविराज एजन्सी राजकुमार रोहरा,सावन कृपाल रुहानी मिशन राम आहुजा, सरपंच अशोक धर्मे,यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभागी शाळेतील क्रीडा शिक्षक,नेमून दिलेले शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.