
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...!
काटोल | प्रतिनिधी
काटोल येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये भारताचा ७७ वा 'प्रजासत्ताक दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर वातावरणात आयोजित या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी. नगराध्यक्षा सौ.वैशालीताई ठाकूर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुनीलजी नारनवरे, विजयजी महाजन, सोपानजी हजारे, हर्षददादा बनसोड, डॉ. रवीजी दलाल उपस्थित होते. युथ फाऊंडेशनचे संचालक विद्धेश्वरजी उर्फ बंडू गजबे, विकासजी सोमकुवर, सिद्धार्थ बागडे, दीपकजी ढोके, तसेच संध्या सहारे, चोपडे मॅडम, चुरागडे मॅडम, दीक्षा मॅडम, लीलाधर कामडी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य व नाटिकांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम व्यक्त केले. नर्सिंग विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवेत राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात वैशालीताई ठाकूर यांनी “सेवेबरोबरच राष्ट्रभक्ती जोपासणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केले.
सूत्रसंचालन अलफिया शहा यांनी केले. आभार दीपकजी ढोके यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.