logo

ड्युटीवर जाण्यापूर्वी एस. टी. चालकांची दारूपार्टी उघडकीस



मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या परळ डेपोतील कर्मचारी विश्रांतीगृहात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळल्याने खळबळ उडाली. रविवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला. त्याच वेळी सातारा डेपोचा एक चालक जेवत असताना चक्क पाण्याच्या बाटलीतून दारू पीत असल्याचे

निदर्शनास आले. संबंधित चालकासह उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करून दोषींना तत्काळ निलंबित करावे, असे आदेश सरनाईक यांनी दिले.

2
47 views