
श्रीरामपुरात चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा बायकोने केला खुन...
श्रीरामपुरात चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा बायकोने केला खुन...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की,पोकॉ/१९३५ कैलास तुकाराम झिने, वय- ५० वर्षे, नेमणुक-श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन, श्रीरामपुर यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन लेखी फिर्याद दिली ती खालीलप्रमाणे की, मी वर नमुद ठिकाणी ४ वर्षापासुन नेमणुकीस असुन सध्या टिळकनगर बीट हद्दीत बीट अंमलदार म्हणुन कामकाज पाहत असतो.
दि २४/०१/२०२६ रोजी सकाळी ०८/४५ वा सुमारास मला दत्तनगरचे पोलीस पाटील अनिल गायकवाड यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळेच्या मागे, दत्तनगर येथे रडण्याचा आवाज येत असुन एक इसम मयत झालेला आहे. त्यावरुन मी सदर ठिकाणी जावुन सदर प्रेताची पाहणी करता प्रथमदर्शनी त्याच्या डोक्याला मार लागलेला व त्यातुन थोडे रक्त निघाल्याचे दिसत होते. तसेच त्याच्या गळयावर उजव्या साईडला काळया रंगाचा व्रण दिसत होता. तेव्हा सदरबाबत विचारपुस करता सदरचे घर विजु पटाट यांचे असुन त्यांचे घरी मानसकुमार शाहु हे भाडोत्री राहत आहेत. तेव्हा याबाबत तेथे समक्ष हजर महिला नामे रश्मिता मानसकुमार शाहु हिचेकडे विचारपुस केली असता तीने मयत इसम हा तिचा पती असल्याचे सांगुन त्याचे मरणाबाबत उडवाउडवीची उत्तरे देवु लागली. तसेच ती मयताचे प्रेत हॉस्पीटलमध्ये घेवुन जाण्यास नकार देत होती व तात्काळ अंत्यविधी करण्यास सांगत होती.त्यावर मी अॅम्ब्युलस बोलावुन घेवुन नमूद बॉडी साखर कामगार हॉस्पीटल येथे घेवुन गेलो. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास उपचारापुर्वीच मयत घोषीत केले.
दरम्यान मी सदर घटनेबाबत पोनि श्री देशमुख यांना सविस्तर माहिती कळविली. तसेच याबाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन आ.मृ नं १०/२०२६ बी.एन.एस.एस कलम १९४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. मयताच्या प्रेतावर पी.एम.टी हॉस्पीटल, लोणी येथे पोस्ट मार्टेम करण्यात आले त्यामध्ये वैदयकिय अधिकारी यांनी मयताच्या मरणाबाबत अभिप्राय दिला आहे. तेव्हा सदर आकस्मिक मृत्यूच्या चौकशीकामी मयतची पत्नी रश्मिता मानसकुमार शाहु हिचेकडे पोनि देशमुख, सपोनि जाधव यांनी तिला विश्वासात घेवुन तिचेकडे सखोल चौकशी केली असता तिने पती मानसकुमार शाहु हा खुप दारु पिवुन मारहाण करत असे व संशय घेत असे त्यामुळे मी त्यास डोक्यात आंब्याचे लाकुड मारुन व गळा आवळुन मारल्याची कबुली दिली आहे.
म्हणुन माझी तिचेविरुध्द बी.एन.एस १०३(१) प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद आहे अशा आशयाची तक्रार पोलीस शिपाई श्री.झिने यांनी दिल्यामुळे रश्मिता हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांनी व त्यांच्या टीमने योग्य तपास करुन हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015