
कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिना निमित्त बागलाण तालुक्या च्या वतीने अनोखा उपक्रम
💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त बागलाण टीमच्या वतीने अनोख्या अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.दिनांक २४/१/२०२६ शनिवार रोजी सकाळी दहा वाजता सटाणा येथील सरकारी दवाखाना येथे, सटाणा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.हर्षदाताई राहुल पाटील, नगरसेविका सन्मा.मनिषाताई पवार, सन्मा.तनुजाताई नांद्रे, डॉ.विद्या सोनवणे ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नाशिक ग्रामीण महिला अध्यक्ष वैशाली सोनवणे यांनी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन ह्या संस्थेची माहिती देऊन त्या माध्यमातून घेत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली.ह्यावेळी नगराध्यक्षा व नगरसेविकांच्या हस्ते सर्व परिचारिकांचा हळदीकुंकूचे वान देऊन सन्मान करण्यात आला,वान देतांना एक सामाजिक संदेश समाजाला देता यावा म्हणून पदाधिकारी ज्योतीताई ठाकरे यांनी कापडी पिशव्यांचे वाटप करुन प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला, हर्षदा पाटील यांनी आपल्या मनोगतात प्लास्टिक मुक्त शहर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असे मत व्यक्त करुन कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या माध्यमातून घेत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व आम्हांला सुध्दा ह्या समुहामध्ये सामील व्हायला आवडेल, यापुढे कधीही आमची मदत लागली तर आम्ही तात्काळ ती पुर्ण करु असे आश्वासन दिले.ह्या वेळी सर्व परिचारीकांनी या आधी कधीच कोणी येऊन आमच्या कामांची दखल घेऊन आमचा सन्मान केला नव्हता, परंतु कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन बागलाण टीमने आमची दखल घेतली त्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लार्क श्रीमती.मीनाताई सोनवणे, सिक्युरिटी गार्ड श्रीमती भाग्यश्रीताई बच्छाव यांनी सुंदर असे नियोजन केलेले होते, सुंदर अशी रांगोळी काढली होती,सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, चहा, नाष्टा, बैठक व्यवस्था आणि हळदीकुंकवासाठी लागणारे सर्व साहित्याची उत्कृष्ट व्यवस्था त्यांनी केली होती, सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांनी त्यांचे आभार मानले, ह्यावेळी वैशाली सोनवणे,अर्चना पाटील, मिनाक्षी सोनवणे यांच्या माध्यमातून सर्वांच्या हस्ते रुग्णालयांतील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बिस्किटे वाटप करण्यात आले. यावेळी पुष्पा जाधव, राजश्री पंडित,पोर्णिमा शिवदे, शारदा जाधव, मनिषा पांडे,विद्या भामरे,मालती चव्हाण, अल्का मुजगे, लीलावती कापडणीस,द सुनिता शिंदे, वैशाली बागुल सुनिता वाघ, चंद्रकला शिंदे, वैशाली गायकवाड ह्या उपस्थित होत्या.