logo

मतदानाचा अधिकार म्हणजे संघर्षातून मिळवलेला संविधानिक हक्क — लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आवाहन

मतदानाचा अधिकार म्हणजे संघर्षातून मिळवलेला संविधानिक हक्क —
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आवाहन

भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेला मतदानाचा अधिकार हा कोणत्याही सत्तेची देणगी नसून,
तो विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संघर्षातून मिळवलेला संविधानिक हक्क आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान, स्वतंत्र व निर्भय मतदानाचा अधिकार बहाल केला. हा अधिकार म्हणजे समाजातील वंचित, शोषित आणि सामान्य जनतेला लोकशाही मार्गाने सत्तेत सहभाग मिळवून देणारे शांततेचे क्रांतिकारक शस्त्र आहे.

आजही समाजात राजकीय उदासीनता वाढताना दिसत आहे, जी लोकशाहीसाठी घातक ठरू शकते.
मतदान न करणे म्हणजे आपल्या हक्कांवर स्वतःच गदा आणणे होय.
लोकशाही टिकवायची असेल, संविधानाचे मूल्य जपायचे असेल, तर प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार निर्भयपणे आणि जबाबदारीने बजावणे अत्यावश्यक आहे.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना हे आवाहन करण्यात येते की,
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक हक्काचा सन्मान राखत
मतदान करून लोकशाही बळकट करा.

मतदान करा —
कारण मत हेच परिवर्तनाचे बीज आहे!

राष्ट्रीय मतदार दिनाच्या क्रांतिकारी शुभेच्छा!
जय संविधान! जय लोकशाही!

आपला विश्वासू,
अमर मधुकर जोगदंड सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिक. तालुका दौंड.जि. पुणे
ई-मेल:-jogdand.amar1@gmail.com
मोबाईल : 8888058805

1
35 views