logo

हळदी-कुंकू समारंभा निमित्त स्त्री शक्तीचा सन्मान, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग”

मा. नगरसेवक घनश्याम कणसे व
सौ. माधुरी घनश्याम कणसे
यांच्या सौजन्याने हळदी-कुंकू समारंभ उत्साहात साजरा
मा. नगरसेवक घनश्याम कणसे व
सौ. माधुरी घनश्याम कणसे यांच्या सौजन्याने आयोजित हळदी-कुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
समारंभात पारंपरिक पद्धतीने तीळगुळ व वाण वाटप करण्यात आले.
हे वाटप सौ. माधुरी घनश्याम कणसे यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना
मा. नगरसेवक घनश्याम कणसे म्हणाले,
“हा कार्यक्रम म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आहे. स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.”
तर सौ. माधुरी घनश्याम कणसे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले,
“एक स्त्री म्हणून मला देखील या स्त्री शक्तीचा सन्मान करता येतोय, याचा सार्थ अभिमान आहे.”
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती लाभली ती विद्यमान नगरसेविका सौ. जयश्री रवींद्र फाटक यांची. अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम समाजात सलोखा व एकोपा वाढवतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामर्थ्य प्रतिष्ठानच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिली. यामध्ये गौरी जाधव, अंकिता जाधव,अर्चना पवार, रमीला महिडा, अपर्णा भोसले, सुलभा सुर्वे, शीतल सोनावणे, सोनाली घाडीगांवकर, संगीता वाघ,सोनाली घाडीगांवकर, सपना भोसले, अश्विनी निकम, माया शिंदे, आशा राव, पुष्पा डोईफोडे यांचा समावेश होता. तसेच मधुकर माने, किशोर शिंदे, विष्णू पाटील, अनिल भोसले, शैलेश घोरपडे, गणेश माने, निखिल जाधव, अभिषेक माने, रोहन शिरोडकर, श्रीकांत पाटील,संदेश कदम, अजित कोरडे यांनी विशेष योगदान दिले.
समारंभाच्या शेवटी उपस्थित अनेक महिलांनी मा. नगरसेवक घनश्याम कणसे व सौ. माधुरी घनश्याम कणसे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

8
1037 views