
Shubhada Gogate Passes Away: ज्येष्ठ लेखिका शुभदा गोगटे यांचे निधन
प्रसिद्ध 'यंत्रायणी' कादंबरी च्या लेखिका शुभदा गोगटे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी नि
Shubhada Gogate Passes Away: ज्येष्ठ लेखिका शुभदा गोगटे यांचे निधन
प्रसिद्ध 'यंत्रायणी' कादंबरी च्या लेखिका शुभदा गोगटे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधनपुणे: मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका शुभदा गोगटे (वय 82) यांचे शनिवारी (दि.24) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती शरद गोगटे, दोन मुली असा परिवार आहे. गाेगटे यांनी लेखनाची सुरुवात विज्ञान काल्पनिकतेने केली.
त्यांची पहिल्याच 'यंत्रायणी' या वैज्ञानिक कादंबरीला १९८३ सालचा राज्य सरकारचा साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या बऱ्याच विज्ञान आणि गूढ कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. साहित्य अकादमी आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास यांनी प्रकाशित केलेल्या भारतीय वैज्ञानिक कथांच्या प्रातिनिधिक संग्रहात त्यांच्या विज्ञानकथांचा समावेश आहे.
गोगटे यांच्या भारतातील रेल्वे इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आधारित 'खंडाळ्याच्या घाटासाठी' आणि 'सांधा बदलताना' या दोन कादंबऱ्या गाजल्या. 'खंडाळ्याच्या घाटासाठी' कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह. ना. आपटे पुरस्कार तसेच मृण्मयी पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांचे डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या 'रिव्हरसिंग द हॉर्ट डिसीज' या कार्यक्रमावर आधारित 'हृदयविकार निवारण' हे पुस्तक प्रकाशित झाले.