
माणगावात नवीन होत असलेल्या रस्त्यामुळे नागरिक, महिला, विध्यार्थी व जेष्ठ नागरिक यांचे हाल....
कोल्हापूर :
माणगाव, तालुका हातकणंगले, जि. कोल्हापूर या गावात गेल्या ४० ते ५० दिवसापासून माणगाव फाटा ते आण्णाभाऊ साठे नगर एकूण पाच किलो मिटर पर्यंतचा कॉंक्रीट रस्त्याचे कामकाज चालू आहे पण आज पर्यंत साधारण एक किलोमीटर पर्यंतचा कच्चा रोड तयार झाला आहे .या दरम्यान गावातून येणारा मुख्य रस्ता ग्रेनाईट कारखाना पासून माणगाव फाट्या पर्यंतचा रस्ता चर पाडून पूर्णतः बंद करण्यात येऊन पर्यायी रस्ता दिला गेला होता. हा पर्यायी रस्ता कोणत्या नियमानुसार दिला होता हे कळून आले नाही, पण दिलेला पर्यायी रस्ता कोणत्या स्वरूपाचा आहे हे दर्शविणारे काही photographs देत आहे आपण सुरुवातीला मुख्य रस्ता व सुस्थितीत असणाऱ्या रोडवरच चर पाडून सर्वसामान्य लोकांच्या वाटा बंद करण्यात आला होता तो कोणत्या नियमाने व कोणाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आला याबाबत चौकशी व्हावे. सद्या या रस्त्याची अवस्था अशी आहे कि सायकल वरून जाणारी व्यक्ती सुद्धा सायकल हातात घेऊन चालत गेली पाहिजे. आजच्या घडीला पहाटे पाच वाजले पासून अनेक कामगार, नेकारदार व खास करून शिक्षणासाठी या गावातून जाणाऱ्या विध्यार्थी तसेच नोकरी निमित्त बाहेर गावी जाणाऱ्या महिला व इतर कामानिमित्य इचलकरंजी येथे जाणारे जेष्ठ नागरिक सुद्धा याच मार्गावरून नियमित ये जा करत असतात अशा वाईट रस्त्यावरून येजा करत असताना कित्येक वेळा अपघात झाले आहेत, या अपघातात कोणाला छोटे तर कोणाला मोठे दुखापत झाले आहेत शिवाय यापासून होणारा मानसिक त्रास, शाररिक त्रास आणि सर्वात महत्वाचे आर्थिक त्रास हे न सांगण्या सारखे आहे. तसेच पर्याय रस्ता हा पूर्णपणे कच्चा व धुळीने माखलेल्या रान सदृश जागेतून असल्याने दम्यासारखे आजार असणाऱ्या रुग्णासाठी मृत्यू समान त्रास आहे. उच्च श्रेणीचा रस्ता गावाच्या विकासाच्या दृष्टीने हवाच आहे पण सर्वसामान्य नागरिक, गावकरी, महीला, जेष्ठ नागरिक तसेच विध्यार्थ्यांसाठी जर कर्दनकाळ ठरत असेल अश्या सुविध्यांचा उपयोग काय ? सध्या या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारे tractor प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे लोड घेऊन जाणारे काय कमी नाहीत काही वेळा overload tractor मध्येच रस्त्यावर बंद पडताना दिसून येते तेंव्हा रस्ता बरेच कालावधीसाठी बंद असतो, तसेच एखादा overload tractor पुढे जात असेल तर त्या मागील वाहनधारकास मुख्य रस्त्यावर जाई पर्यंत अर्धा तासापेक्षा अधिक कालावधी त्याच्या मागूनच जावे लागते. अशाने महत्वाचे सर्व कामे खोळंबतात तसेच कामावर जाणारे, विद्यार्थी यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. शासनाच्या नियमानुसार आम्हांला पर्यायी रस्ता चांगल्या दर्जाचे द्या व या त्रासापासून सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाचवा, तसेच संबधित कंत्राटदार व आपल्या कार्यालयातील या कामाशी संबधित असणाऱ्या शासकीय पर्यवेक्षक यांना सक्त ताकीत देऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल याप्रमाणे कृत्य करण्यास आपल्या कार्यालयाकडून लेखी निर्देश व्हावेत हि विनंती. मी या अर्जाद्वारे दोषी असणाऱ्या कोणावरही कारवाई करणेबाबत सांगत नाही पण आम्हांला योग्य तो न्याय मिळावा हीच अपेक्षा, कोणाविरुद्ध तक्रार करणे हे महत्वाचे असते तर खूप काही झाल असतं पण मी तसे न करता सर्व नागरिकाना न्याय मिळो झालेल्या कार्यवाही बाबत मला लेखी कळविण्यात यावी ही विनंती.
अशा आशयाचा तक्रार महाराष्ट्र शासनाच्या online पोर्टल वर
तालुका प्रसिद्धी प्रमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, म.रा.
श्री. सुरेश शंकर जाधव, रा. माणगाव,ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर, यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
सोबत फोटो देत आहे.