नीती आयोगाने सिमेंट, ॲल्युमिनियम आणि एमएसएमई क्षेत्रांमधील हरित संक्रमणावरील अहवाल प्रकाशित केला.
नीति आयोगाने काल दिल्लीत सिमेंट, अल्युमिनियम आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्रांसाठी कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामधील घट यांविषयीच्या आराखड्याचा अहवाल प्रकाशित केला.
या दरम्यान नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसेच भारताच्या विकासातील शाश्वत आर्थिक वाढ यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बळ देण्याचे महत्त्व विषद करताना रोजगार, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकास यांमधील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले.