logo

मोताळा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सुर्यघर योजनेचा लाभ घेण्याचे BDO अशोक काळे यांचे आवाहन..


मोताळा* विजय दोडे
दी 23/1/2025: पंचायत समिती मोताळा यांच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा क्र.2 (PMAY-G) २०२४-२५ टप्प्यातील उदिष्ट मिळालेल्या लाभार्थ्यांना एक महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्र (रुफटॉप सोलर) बसवल्यास केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत भरघोस अनुदान मिळणार आहे.गट विकास अधिकारी अशोक काळे यांनी सांगितले की, लाभार्थ्यांनी घरावर १ किलोवॅट क्षमतेचे सौर संयंत्र बसवल्यास ३० हजार रुपये, २ किलोवॅटचे बसवल्यास ६० हजार रुपये तर ३ किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेचे संयंत्र बसवल्यास ७८ हजार रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. हे अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे दिले जाईल.याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ च्या लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त १५ हजार रुपयांचा लाभही उपलब्ध असल्याचे श्री. अशोक काळे साहेब यांनी नमूद केले. या दुहेरी योजनांचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील कुटुंबे वीज बिलापासून मुक्त होऊ शकतील आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर करून पर्यावरण संरक्षणातही योगदान देऊ शकतील.गट विकास अधिकारी अशोक काळे साहेब यांनी सर्व लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा असे अशोक काळे साहेबांनी सांगितले व सोबतच
.ही योजना ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याबरोबरच देशाच्या हरित ऊर्जा धोरणालाही बळ देणारी ठरणार आहे.

0
1232 views