logo

काटोलमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; २.५० लाखांचा दंड ठोकला.


काटोल (प्रतिनिधी): बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध काटोल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोडकीपुरा ते गळपुरा रोडवर करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपी चेतन अशोक मानकर याला ताब्यात घेऊन तब्बल २.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

गुप्त माहितीवरून रचला सापळा :
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. डीवायएसपी पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, सहायक फौजदार धनराज भुक्ते व पोलीस अंमलदार सचिन डाईलकर यांच्या पथकाने दोडकीपुरा परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी आरोपीकडून प्रतिबंधित मांजा जप्त करण्यात आला.

शहरात पोलिसांचा जनजागृतीचा 'डायल ११२' गजर केवळ कारवाई न करता नागरिकांना सावध करण्यासाठी पोलिसांनी शहरात जनजागृती मोहीमही राबवली. फौजदार विजय बावणे व पोलीस अंमलदार गुलाब भालसागर यांनी 'डायल ११२' च्या माध्यमातून संपूर्ण काटोल शहरात लाऊडस्पीकरद्वारे अनाउन्समेंट केली. नायलॉन मांजा विकणे आणि वापरणे हा कायदेशीर गुन्हा असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन नायलॉन मांजामुळे निष्पाप पक्ष्यांचा आणि दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे नागरिकांनी असा मांजा खरेदी करू नये आणि कुठे विक्री होत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आवाहन काटोल पोलिसांनी केले आहे.

0
0 views