logo

मांगवाडी येथे आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

रिसोड:- येथील उत्तमचंद बगडिया कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथका द्वारा आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिर मध्ये प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते याप्रसंगी डॉ. रामानंद गट्टानी तसेच डॉक्टर अभिषेक तिवारी हे मान्यवर उपस्थित होते या आरोग्य शिबिरामध्ये गावातील बहुसंख्य रुग्णांची तसेच शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनीची तसेच शिबिरार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनीची तसेच महाविद्यालयाच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यानंतर उपस्थित मान्यवरांचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. पी. खेडेकर ह्या होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. ए.जी.वानखेडे यांनी केले यानंतर डॉ रामानंद गट्टानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजनेचा हा उपक्रम स्तुत्य असून आम्ही आमच्या सेवा यापुढेही अशाच देत राहू असे आश्वासन दिले व शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. एम.पी. खेडेकर मॅडम यांनी गावकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतल्याबद्दल उपस्थितांना धन्यवाद दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु अंजली पुंड हिने तर आभार प्रीतम वैरागड याने मानले. सदर शिबिराच्या यशस्वीते करिता डॉ. किरण बुधवंत प्रा डॉ मेश्राम, डॉ कोमल काळे, प्रा सुमित लाहोरे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले

3
67 views