logo

गळ्यात पडली विजयाची माळ, हाती सोपवली जबाबदारीची ढाल; आरोग्य आणि शिक्षणासाठी, आता घुमणार संतोष चऱ्हाटेचा आवायाची तलवार..

प्रशासकीय धुरा आणि राजकीय समन्वय रिसोड नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या आरोग्य व शिक्षण समितीचे सभापतीपद शिवसेना (शिंदे गट) कडे सोपवण्यात आले आहे. ज्येष्ठ नगरसेवक संतोष चऱ्हाटे यांची या पदावर निवड झाल्याने शिंदे गटाचे शहराच्या राजकारणातील वजन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. उपनगराध्यक्ष निवडीनंतर सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष या विषय समित्यांच्या वाटपाकडे लागले होते. 'कार्यतत्पर नेतृत्व' हीच खरी ओळख नवनियुक्त सभापती संतोष चऱ्हाटे यांची कार्यपद्धती अत्यंत आक्रमक आणि जनहितार्थ मानली जाते. "एक कॉल आणि प्रश्नाचे निराकरण" या त्यांच्या कार्यशैलीमुळे नागरिकांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. सार्वजनिक आरोग्यासारखा संवेदनशील विषय हाताळताना त्यांच्या अनुभवाचा शहराला मोठा फायदा होईल, अशी चर्चा नागरी वर्तुळात रंगत आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी जनसेवेला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत.
आरोग्य आणि शिक्षणावर विशेष लक्ष आगामी काळात शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, शुद्ध पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान चऱ्हाटे यांच्यासमोर असणार आहे. यासोबतच, पावसाळी आजार आणि साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार करण्यावर त्यांचा भर असेल. शासकीय शाळांचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, हे देखील त्यांच्या अजेंड्यावरील प्रमुख कार्य असणार आहे.
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय या निवड प्रक्रियेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनाने दोन महत्त्वाच्या समित्यांची सूत्रे महिला सदस्यांच्या हाती दिली आहेत. राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर, स्थानिक पातळीवरही महिलांना निर्णय प्रक्रियेत सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे. महिलांचे प्रश्न अधिक प्रखरतेने मांडले जावेत आणि शहराच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सहभाग असावा, या हेतूने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

0
0 views