logo

पुणे महापौरपद खुला महिला गटासाठी राखीव; राज्यातील 29 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर


पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी खुला महिला गट आरक्षित ठेवण्यात आल्याची घोषणा आज मंत्रालयात जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत करण्यात आली. त्यामुळे पुण्यात आता महिला महापौर निश्चित असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आज राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार 1 महापौरपद अनुसूचित जमातीसाठी, 3 अनुसूचित जातींसाठी, 8 ओबीसी प्रवर्गासाठी तर उर्वरित 17 महापौरपदे सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये महिला व पुरुष आरक्षणाचा समावेश आहे.
मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबईसह अनेक प्रमुख महापालिकांमध्येही महापौरपदासाठी आरक्षण स्पष्ट झाले आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्याने पुण्यासह सर्वच महापालिकांमध्ये महापौरपदासाठी उमेदवारी, राजकीय समीकरणे आणि सत्तास्थापन प्रक्रियेला आता गती येणार आहे.

6
788 views