logo

अखेर इंदापूरमध्ये नागरिकांशी गैरवर्तन करणारा ,भूमी अभिलेख खात्यातील सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी निलंबित..

कोल्हापूर : प्रतिनिधी
'मला नोकरीची गरज नाही मी गंमत म्हणून नोकरी करतो, माझ्याकडे 34 एकर जमीन, 10-20 लाख असे टाकेन, मला नोकरीची गरज नाही,'
असा बोलणारा इंदापूरचा भूमी अभिलेख मुख्यालय सहाय्यक कुलकर्णी यास उपसंचालक, भूमि अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांचे दि. २१/०१/२०२६ रोजीच्या आदेशानुसार निलंबन करण्यात आले आहे.

इंदापूर भूमी अभिलेख खात्यातील अधिका्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर संबंधित विभागाने कडक कारवाई केली आहे.

इंदापूरमध्ये नागरिकांशी गैरवर्तन आणि कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी, इंदापूरमधील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील , मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी यास निलंबित करण्यात आले आहे. विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे यांनी, यासंबंधीचे आदेश काढले आहेत. कुलकर्णी याच्या संदर्भात, अनेक तक्रारी मिळालेल्या होत्या. त्याची चौकशी केल्यानंतर सत्यता आढळून आल्याने त्याच्यावरती ही कडक कारवाई करण्यात आल्याचे, इंदापूर भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
इंदापूरमधील या प्रकरणासंदर्भात शेटफळगडे येथील संतोष रकटे यांनी, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे तक्रार केली होती. जमीन मोजणीची मूळ नक्कल न मिळाल्याने, रकटे यांनी याबाबतची वरिष्ठांकडे तक्रार केलेली होती. त्याचा राग मनात धरून कुलकर्णी यांनी, रकटे यांच्याशी गैरवर्तन केले होते. त्याचबरोबर मोठेपणा सांगत, मला कामाची गरज नाही मी गमंत म्हणून काम करतो, असेही त्यांनी म्हटले होते. याच वेळी कुलकर्णी यांनी नशा केल्याचीही तक्रार केली होती. उपअधीक्षकांनी केलेल्या चौकशीत, याबाबतची खरी बाब आढळून आल्याने, उपअधीक्षकांनी कुलकर्णी यांना निलंबित करण्याचे पत्र, पुणे विभागाच्या उपसंचालकांना दिले होते.
त्यानंतर उपसंचालक विष्णू शिंदे यांनी कुलकर्णीना निलंबित केले आहे. राज्यात अशा धमकीवजा वक्तव्यांमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राज्यात काही ठिकाणी आजही शासकीय अधिकारी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक व शेतकरी बांधवांना अरेरावी व दमदाटीची भाषा करतात, असे अनेक ठिकाणी घडत असणार आहे हे या प्रकरणावरून दिसून आले आहे, अजुनही राज्यात अशी परिस्थिती आहे.

0
319 views