भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन.... दि. २६ जानेवारी कोल्हापुरात पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन ...
कोल्हापूर :प्रतिनिधी
भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी बुधवारी दि . २१/०१/२०२६ रोजीच्या महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.
कोल्हापूरमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते
२६ जानेवारीला जिल्ह्याच्या मुख्यालयात ध्वजवंदन होणार आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ०९.१५ वा. शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख समारंभामध्ये ध्वजवंदन व समारंभपूर्वक संचलन होणार आहे.