logo

दौंड तालुका व शहरात गुटखा–सुगंधित तंबाखू विक्रीचा सुळसुळाट प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी – नागरिकांची मागणी

दौंड तालुका व शहरात गुटखा–सुगंधित तंबाखू विक्रीचा सुळसुळाट
प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी – नागरिकांची मागणी

दौंड (जि. पुणे) :
महाराष्ट्र शासनाने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर संपूर्ण बंदी घातलेली असतानाही, दौंड तालुका व शहरामध्ये अनेक पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच मोठ्या प्रमाणावर साठवणूक करणारे होलसेल व्यापारी खुलेआम या प्रतिबंधित पदार्थांची विक्री करत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे.

विशेषतः शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वे परिसर व वस्ती भागात या पदार्थांची विक्री सर्रास सुरू असून याचा थेट परिणाम युवक, विद्यार्थी व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. तोंडाचा कर्करोग, व्यसनाधीनता व इतर गंभीर आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असूनही प्रशासनाची कारवाई तोकडी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणे हे
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006,
COTPA कायदा,
तसेच महाराष्ट्र शासनाच्या बंदी आदेशांचे सरळ उल्लंघन आहे. तरीदेखील काही विक्रेत्यांवर नाममात्र कारवाई करून पुन्हा त्याच ठिकाणी विक्री सुरू असल्याचे चित्र आहे.

नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून खालील ठाम मागण्या करण्यात येत आहेत :

🔹 दौंड तालुका व शहरात विशेष मोहीम राबवून सर्व पानटपरी, दुकाने व गोदामांची तपासणी करावी.
🔹 गुटखा व प्रतिबंधित पदार्थ विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
🔹 मोठ्या प्रमाणावर साठवणूक करणाऱ्या होलसेल व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
🔹 वारंवार नियमभंग करणाऱ्या दुकानदारांचे दुकान परवाने (Shop License) कायमस्वरूपी रद्द / जप्त करावेत.
🔹 जप्त केलेला साठा नियमाप्रमाणे नष्ट करावा.

जर तात्काळ आणि ठोस कारवाई करण्यात आली नाही, तर नागरिकांना वरिष्ठ प्रशासन, लोकायुक्त व न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासनाने राजकीय दबाव किंवा दुर्लक्ष न करता कठोर भूमिका घ्यावी, अशी जोरदार मागणी दौंडकर नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आपला विश्वासू,
अमर मधुकर जोगदंड सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिक. तालुका दौंड.जि. पुणे
ई-मेल:-jogdand.amar1@gmail.com
मोबाईल : 8888058805
दिनांक : 22/01/2026

6
232 views