logo

कोण होणार ठाणे महानगर पालिकेच्या किल्लेदार?? महापौर कोण होणार???

ठाणे | प्रतिनिधी.
ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदावर यावेळी कोण विराजमान होणार, याबाबत शहरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक दिग्गजांची नावे चर्चेत असली तरी महापौर पदासाठी आरक्षणाचा कौल कुणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण ठाणे शहराचे लक्ष लागले आहे. विशेषतः वागळे इस्टेट प्रभागातील जनतेचे लक्ष या घडामोडीकडे केंद्रित झाले आहे.
महापौर पद महिला आरक्षणासाठी राखीव झाल्यास,
मा. विधानपरिषद आमदार रवींद्रजी फाटक यांच्या पत्नी सौ. जयश्रीजी फाटक,
शिवसेना सचिव संजयजी मोरे यांच्या पत्नी सौ. सुखदाजी संजय मोरे,
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू सहकारी, ऑपरेशन टायगर यशस्वीपणे राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे रणनीतीकार, ज्येष्ठ नगरसेवक श्री. राम रेपाळेजी
यांची नावे महापौर पदासाठी चर्चेत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
तर महापौर पद अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाल्यास, वागळे इस्टेट विभागातून निवडून आलेल्या सौ. दर्शनाजी योगेश जानकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
एकूणच यावेळी महापौर पद वागळे इस्टेट विभागाकडे येते का?, आणि ठाणे महानगरपालिकेच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण ठरणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आरक्षणाच्या अधिकृत घोषणेनंतरच या राजकीय चित्राला अंतिम रूप मिळणार आहे.

50
2973 views