logo

धुळ्यात घरफोडीच्या तयारीत असलेल्या भुऱ्याला केले जेरबंद



धुळे : शहरातील चाळीसगाव रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. शाकीर रमजान शाह उर्फ भुऱ्या (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

२० जानेवारी रोजी मध्यरात्री चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे पथक परिसरात गस्त घालत होते. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पवन नगर भागात पोलिसांना एका घराच्या भिंतीच्या आडोशाला एक तरुण संशयितरीत्या आढळला. या तरुणाने आपला चेहरा रुमालाने बांधलेला होता

आणि तो अंधाराचा फायदा घेऊन लपण्यासाठी प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यांत घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे चोरी करण्याच्या उद्देशाने अडीच फूट लांबीची लोखंडी सळईसह विविध प्रकारच्या वाहनांच्या चाब्यांचा जुडा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल पंकज़ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिसात संशयित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १२ गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

4
333 views