गंगाधाम चौक ते लुल्लानगर मार्गावर दुपारी भीषण वाहतूक कोंडी, वाहतूक नियोजनाचा फज्जा
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डजवळील गंगाधाम चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (लुल्लानगर)–भैरोबा नाला या मार्गावर आज दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान तीव्र वाहतूक कोंडी झाली. मालवाहू वाहनांची वाढती वर्दळ, अरुंद रस्ता, रस्त्यावरील अतिक्रमण तसेच बेशिस्त वाहनचालक यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मार्केट यार्डमधील वाहतूक यांचा ताण एकाच वेळी आल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. दुचाकी, चारचाकी तसेच सार्वजनिक वाहतूक वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले होते.