logo

नांदेडमध्ये शेतीच्या व्यवहारात दाेन काेटींची फसवणूक

पाच जणां विराेधात गुन्हा दाखल
--
नांदेड ः नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील वडिलाेपार्जित शेतजमीन जमिनीच्या व्यवहारातून पाच जणांनी संगणमत करुन एकाची दाेन काेटींची फसवणुक केली. या प्रकरणी सतीष माराेतीराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांविराेधात इतवारा पाेलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १९) राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, सुमनबाई नारायण साखरे यांनी त्यांची वडिलाेपार्जीत शेत जमीन वारसा हक्का प्रमाणे न्यायालयात दावा केला हाेता. शेतजमीन हक्क मिळाल्यानंतर ती शेतजमीन विक्री सतीष शिंदे रा. हदगाव यांच्यानावे करण्याचे ठरले त्यासाठी सुमनबाई साखरे, बालाजी हरी गाेरेे (रा.नांदेड), माराेती गुंडाळे (रा. नांदेड), नारायण राजाराम साखरे, राजेश नारायण साखरे रा. पिंपरखेड ता. हदगाव यांना सतिष शिंदे यांनी दाेन काेटी रुपये दिले. त्यापाेटी १०० व ५०० च्या बाॅन्डवर लेखी दिले.मात्र, सुमबाई व इतर लाेकांनी न्यायालयातील दावा उचलून घेतले व शेत जमीन सतिष शिंदे यांच्या नावावर केले नाही व दाेन काेटींची फसवणुक केली. या प्रकरणी सतिष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0
0 views