logo

महामार्गाचा.. मार्ग मोकळा.. कोल्हापूर - सांगली ( चोकाक ते अंकली ) पर्यंत येणाऱ्या जमिनी केंद्र सरकारला हस्तांतरित .... भारत सरकारचा राजपत्र प्रसिद्ध..

कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चे मार्ग विस्तारित व रुंदीकरण करणे कमी चोकाक ते अंकली फाट्या पर्यंत असणारे साधारण ३५ किलोमीटर अंतर असणारी भूसंपादित केली जाणारी जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात आली आहे.
भारत सरकारचा दि. १६/०१/२०२६ रोजीच्या राजपत्रानुसार सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय यांच्या अधिसूचनेने कोल्हापूर ते सांगली यादरम्यान येणाऱ्या चोकाक ते अंकली फाटा पर्यंतचे एकूण ४४.४६६२९३ इतके हेक्टर जमीन संपादित असून त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील मजले, हातकणंगले, माणगाववाडी, अतिग्रे व चोकाक असे एकूण पाच तसेच शिरोळ तालुक्यातील उदगाव, जैनापूर, उमाळवाड, निमशिरगाव व तमदलगे असे पाच गावातील एकूण ४३१ गटामधील जमिनी आहेत.
सदरील जमीन अधिग्रहण अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग कायद्याचे कलम 3D अन्वये लागू आहे.

13
634 views