logo

**श्रीरामपूर तालुक्यात बेकायदेशीर व धोकादायक डबल ट्रॉली ऊस वाहतुकीविरोधात निवेदन** श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर व ज

**श्रीरामपूर तालुक्यात बेकायदेशीर व धोकादायक डबल ट्रॉली ऊस वाहतुकीविरोधात निवेदन**

श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर व जीवघेण्या डबल ट्रॉली ऊस वाहतुकीविरोधात मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या वतीने श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे डबल ट्रॉलीद्वारे तसेच ट्रकमध्ये अनधिकृत बदल करून केली जाणारी ऊस वाहतूक ही नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी असल्याने ती तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा कोणत्याही बेकायदेशीर वाहतुकीस परवानगी दिलेली नाही तसेच नियमबाह्य वाहनांवर कारवाई सुरू आहे.

दरम्यान, मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष भागचंद नवगिरे यांनी आक्षेप घेत ऊस वाहतुकीसाठी काही अधिकाऱ्यांना दरमहा हप्ते दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळेच संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा दावा त्यांनी केला.

पुढील दहा दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ही धोकादायक व बेकायदेशीर ऊस वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी सागर भोंडगे, प्रवीण वैरागर, आकाश भोंडगे, रोहन गायकवाड आदी उपस्थित होते.

1
13 views