
बोगस दिव्यांगांचे धाबे दणाणणार ५०० हून अधिक कर्मचारी रडारवर...
८ जण आधीच निलंबित कारवाईची व्याप्ती वाढणार...
जळगाव : जिल्हा परिषदेत बोगस तदिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी आणि सवलती लाटणाऱ्या ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुन्हाड कोसळली आहे. तर आठवडाभरात अनेक कर्मचाऱ्यांचे पडताळणी अहवाल प्राप्त होणार आहे. यानंतर जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रमाणपत्रांची शासनाच्या विविध कल्याण विभागांनी सेवेत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले होते. जि. प. च्या विविध विभागांत ५८१ कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केली असल्याची नोंद प्रशासनाकडे होती. या सर्व कर्मचाऱ्यांच्या युडीआयडी प्रमाणपत्रांची सखोल तपासणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. खन्ऱ्या दिव्यांगांच्या हक्कावर गदा आणून खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्यांचे रॅकेट या कारवाईमुळे उघड होण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीपूर्वी चौकशी पूर्ण करून कारवाईची व्याप्ती वाढवण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
आगामी आठवडा ठरणार 'निर्णायक'...
जिल्हा परिषद प्रशासनाकडे हळूहळू अहवाल प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत बोगस प्रमाणपत्र सिद्ध झालेल्या ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. येत्या
आठवड्याभरात उर्वरित ५०० हून अधिक कर्मचाऱ्याऱ्यांचे अंतिम अहवाल सादर होतील. यामध्ये ज्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट आढळेल, त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.