अधिवेशनाचे दिमाखदार उद्घाटन
🔹 ग्रंथदिंडी, पुरस्कार वितरण व ग्रंथप्रदर्शनाने कार्यक्रमास रंगत
मान्यवरांच्या उपस्थितीत पारोळ्यात ग्रंथालय अधिवेशनाचे दिमाखदार उद्घाटन
🔹 ग्रंथदिंडी, पुरस्कार वितरण व ग्रंथप्रदर्शनाने कार्यक्रमास रंगत
🔹 वाचनसंस्कृती बळकट करण्यासाठी ग्रंथालयांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा
वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी पारोळ्यात भव्य ग्रंथालय अधिवेशन संपन्न
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
पारोळा येथे दि. १८ जानेवारी २०२६ रोजी नाशिक विभाग ग्रंथालय संघ व जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक ग्रंथालय अधिवेशन मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्राचे संचालक अशोक गाडेकर होते. प्रमुख उपस्थितीत राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, उपनगराध्यक्ष रोहन मोरे, देवगावचे आदर्श सरपंच समीर पाटील, डॉ. शांताराम पाटील, नगरसेवक छोटू पाटील, जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, पारोळा पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे, अहिल्यानगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास शिंदे, नंदुरबारचे धर्मसिंह वडवी, धुळ्याचे जगदीश पाटील, जालन्याचे चंद्रशेखर ठाकूर, संभाजीनगरचे अनिल बाविस्कर, जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतीश पाटील व पारोळा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी व ग्रंथप्रेमी उपस्थित होते.
अधिवेशनानिमित्त शहर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ग्रंथदिंडी काढून ग्रंथपूजन करण्यात आले आणि वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरपंच समीर पाटील, महेंद्र बोरसे, डॉ. शांताराम पाटील आदी मान्यवरांनी ग्रंथालय चालवताना येणाऱ्या अडचणी, समस्या व त्यांच्या निराकरणाबाबत आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी व सतीश दशरथ पाटील यांनी केले. यावेळी अशोक गाडेकर यांनी शासनाच्या विविध ग्रंथालयविषयक योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. गजानन कोटेवार यांनी ग्रंथालयांच्या प्रमुख मागण्या व समस्यांवर सविस्तर भाष्य करत वाचनसंस्कृतीच्या बळकटीकरणाची गरज अधोरेखित केली.
या प्रसंगी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच कस्तुरी प्रकाशन (गोकुळ बागुल सर, इंगळे मॅडम) व साप्ताहिक कुंभ विकास यांचे ग्रंथप्रदर्शन स्टॉल्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. स्नेहभोजनानंतर दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान “वाचनसंस्कृतीची आवश्यकता” या विषयावर प्रा. लिलाधर शिवाजी पाटील यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
या अधिवेशनासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, नाशिक आदी जिल्ह्यांतून अविनाश भदाणे, रोहिदास हाके, प्रवीण पाटील, संभाजी पवार, सचिन जोपुळे (सहाय्यक संचालक, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र), प्रशांत पाटील (सहाय्यक संचालक, मुंबई) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, किशोर रामराव पाटील, सागर भगुरे, किरण बडगुजर, मनोज पाटील, दिगंबर पाटील, पी. बी. पाटील सर, रवींद्र पाटील (अजनविहीरे), संजय पाटील (चौबारी), कविता पाटील, योगेश पाटील, दीपक पवार, सुकलाल पाटील आदींनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन राधेश्याम पाटील (चोपडा) यांनी केले, तर समारोप व आभार प्रदर्शन पारोळा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने या प्रेरणादायी ग्रंथालय अधिवेशनाची सांगता झाली.