
ठाणे (वागळे इस्टेट – शिवाजीनगर) | प्रतिनिधी
ठाणे वागळे इस्टेट शिवाजीनगर येथे संपन्न होणार सिद्धीविनायक मंदिराचा वर्धापन दिन..
ठाणे (वागळे इस्टेट – शिवाजीनगर) | प्रतिनिधी
ठाणे वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर परिसरात शिवचैतन्य मित्र मंडळा तर्फे श्री सिद्धीविनायक मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन शिवसेना सचिव संजयजी मोरे व नगरसेविका सौ. सुखदा संजय मोरे यांच्या निमंत्रकत्वाखाली, तसेच विभाग प्रमुख संजयजी भोसले, विभाग समन्व्यक प्रकाशजी पालकर, अध्यक्ष प्रमोद गुरव, सरचिटणीस संजय ठाकुर, खजिनदार बाळा तेटगुरे, प्रसाद एकबोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.
हा वर्धापन दिन सोहळा दि. 22 जानेवारी व 23 जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमात श्री गणेश याग, पुण्याहवाचन, गणेश पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, तसेच श्री गणेश अथर्वशीर्ष 1000 आवर्तन, प्रधान यज्ञ अशा विधींचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय सत्यनारायण महापूजा, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन असून, महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.