logo

खंडाळा मकरध्वज येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची विनोद साळवे यांची मागणी. AIMA NEWS BULDHANA ASIF SHAIKH

Maharashtra Buldhana news चिखली येथून जवळच असलेल्या खंडाळा मकरध्वज, पं स. चिखली. जि. प. बुलढाणा अंतर्गत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय अवचितराव पवार यांनी मुख्यालयी राहत नसताना सुद्धा मुख्यालयी राहत असल्याबाबतची खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल तसेच आर्थिक फसवणूक करून आर्थिक लाभ पदरात पाडून घेतला आहे. सदरची बाब ही संवैधानिक दृष्ट्या अत्यंत गंभीर असून शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुख्याध्यापक श्री दत्तात्रय अवचितराव पवार यांची सखोल व खातेनिहाय चौकशी करून मुख्याध्यापक दत्तात्रय पवार यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विनोद साळवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे केली आहे.

तक्रार अर्जाच्या प्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी साहेब, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, बुलढाणा यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत.

43
26 views