logo

दिंडोरी येथे आंदोलनस्थळी आंदोलकांनी पेटवल्या चुली

दिंडोरी - मनोज पाटील

किसान सभेकडून शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले बिन्हाड आंदोलन चौथ्याही दिवशीही सुरूच आहे. आंदोलनस्थळी चुली पेटवून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
शेतकरी व शेतमजूर यांचे प्रश्न, आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी, विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली हे बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनीया आंदोलनात दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदर बिन्हाड आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. या आंदोलनात दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदर बिन्हाड आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.यावेळी तहसील कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी मुक्काम ठोकत भोजनासाठी चुली पेटवल्या असून, आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. शासन व प्रशासनाने तातडीने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

24
353 views