आम्ही शपथ घेतो कि मी स्वतः परीक्षेत कॉपी करणार नाही व दुसऱ्या कोणालाही करू देणार नाही... आज पासून शाळेत शपथ .. दहावी, बारावी बोर्डाचा उपक्रम ....
दहावी, बारावी बोर्डाचा खास उपक्रम... फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या दहावी/बारावी परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये याकरिता परीक्षा मंडळामार्फत आज मंगळवार दि. २०.०१.२०२६ रोजी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परिपाठावेळी कॉपीमुक्त अभियानाची वरीलप्रमाणे सर्व विध्यर्थ्यांकडून शपथ घेण्यात आली.त्याचप्रमाणे २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत कॉपीमुक्त अभियानाची माहिती देण्यात येणार असून त्यादिवशी विधार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी कॉपीमुक्त शपथ घ्यायची आहे.तत्पूर्वी दि. २४ रोजी कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी घोषवाक्यासह शाळा परिसरात जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे.. कॉपीमुक्त अभियानाची गावस्तर व शाळा पातळीवर याची अंमलबजावणी करणेबाबत संबधित प्राचार्य व मुख्याध्यापक यांना माहिती देण्यात आली आहे अशी माहिती संबधितांकडून सांगण्यात आली आहे .सदरील कॉपीमुक्त अभियान, जनजागृती अभियान २६ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे.