logo

श्री.शिवम ज्ञानदेव निकम यांच्या पुढाकाराने आयोजित राजधानी सातारा जिल्हास्तरीय गडदुर्ग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जलमंदिर पॅलेस

दरवर्षी प्रमाणे श्री.शिवम ज्ञानदेव निकम यांच्या पुढाकाराने आयोजित राजधानी सातारा जिल्हास्तरीय गडदुर्ग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जलमंदिर पॅलेस येथे उत्साहात पार पडला. गडदुर्ग संवर्धन, इतिहासप्रेम आणि तरुणाईमध्ये छत्रपती शिवरायांच्या शौर्याची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.
या प्रसंगी प्रतापगड प्राधिकरण समितीचे श्री.पंकज चव्हाण, श्री.कौस्तुभ फडतरे, श्री.प्रतीक बर्गे, श्री.साहिल जाधव, श्री.चैतन्य पंडित, श्री.प्रथेमश जाधव, श्री.निखिल मांढरे तसेच रक्षक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत यश संपादन केलेल्या स्पर्धकांचा गौरव करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. गडदुर्गांच्या जतन-संवर्धनासाठी असे उपक्रम सातत्याने घडत राहावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

3
583 views